रिलायन्सने एमएमआरडीएचे कोट्यवधी ठकवले

 12 Dec 2017  492

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

नागपूर, 12/12/2017

 देशातील मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे  मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडसस्ट्रीज समुहाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) जवळपास दोन हजार कोटी रूपये थकवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेच्या तारांकित प्रश्नोत्तरात दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शरद सोनावणे यांनी विविध उद्योगपतीसंस्थाहॉटेल्स आदींनी एमएमआरडीएला देय असलेली रक्कम थकवल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यानी अधिमूल्य रकमेची थकबाकी ठेवलेल्या उद्योग आणि संस्थाची माहिती दिली आहे. त्यात अंबानी यांच्या समुहाचे नाव उघड झाले.

एमएमआरडीएने आपल्या मालकीच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भूखंडाचे वाटप केले आहे. या भूखंडावरील इमारतींचे बांधकाम चार वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र, भूखंड मिळालेल्या संस्थांनी विहित कालावधीत बांधकाम पूर्ण न केल्याने एमएमआरडीएने अधिमूल्याची भरणा करण्यासाठी तसेच भूखंड परत घेण्याबाबत नोटीस बजावली असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१७ अखेर रिलायन्स इंडिस्ट्रीजकडे एका भूखंडापोटी ४४१ कोटी रूपये तर दुसऱ्या भूखंडापोटी एक हजार ५३८ कोटी रूपयांची थकबाकी आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीकडे ५६ कोटीजमुनाबेन फाऊंडेशनकडे २४ कोटीतालीम रिसर्च पाऊंडेशनकडे ३३ कोटी तर नमन हॉटेलकडे ३१.६८ कोटी रूपयांची थकबाकी आहे.