ओखी वादाचा मुंबईच्या किनाऱ्यांना धोका, सहा समुद्र प्रवेशद्वारे बंद ठेवणार

 09 Dec 2017  484
मुंबई, सोमवार 

अरबी समुद्रात येणाऱ्या ओखी चक्री वादळाचा धोका मुंबईच्या किनारपट्ट्यांना बसणार आहे. यामुळे मुंबई महापालिकेने समुद्राचे सहा मुख्य प्रवेशद्वार ५ व ६ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना समुद्र किनारी मज्जाव, बॅरीकेट्स व संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना कुलाबा प्रादेशिक हवामान खात्याने दिल्या आहेत. 
 
अरबी समुद्रात आलेल्या ओकी चक्रीवादळाचा परिणाम गुजरात आणि मुंबई दक्षिण किनारपट्टीवर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई किनारपट्टी पासून तब्बल ६९० किमी समुद्रात हा ओखी नावाचे वादळ सुरू झाले आहे. ५ डिसेंबरला मध्यरात्री गुजरात सुरतकडून मुंबईकडे ५० ते ६० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या वादळाची पूर्व कल्पना देण्यात येत असून कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, मच्छीमारांनी ५ व ६ डिसेंबरला समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, अशी सूचना दिली आहे. महाराष्ट्रातून उत्तरेकडे ६ आणि ७ डिसेंबरला पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधित समुद्रात येणाऱ्या उंच लाटांच्या उसलणार आहेत. यामुळे समुद्राला येणाऱ्या उधानामुळे कॅडल रोड आणि शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची भिती वर्तवली जात आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याने त्यांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आले आहे. तसेच किनाऱ्यावरील स्टॉल्संना देखील बंदी घातली. दरम्यान, आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास अग्निशमन दल, पोलीस, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल, स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना कुलाबा प्रादेशिक हवामान तज्ज्ञ विभागाने सर्वच शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. 
 
समुद्र किनारी बॅरीकेट्स 
समुद्र किनारील वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. चैत्यभूमीवर येणाऱ्या जनसमूदायाकरिता भरती आणि ओहोटीचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या सर्वच समुद्रकिनारी कोणीही जावू नये म्हणून पालिकेकडून बॅरीकेटिंग लावण्यात येणार आहेत.