पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या वतीने बालदिन"कार्यक्रम आयोजित

 22 Nov 2017  483





शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 
 
मुंबई, 17/11/2017

 
       पालिकेतील  माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा)आंबेरकर यांच्या वतीने शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०१७ रोजी  सायंकाळी 5 वा. लहान मुलांसाठी "बालदिन"कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  सदर कार्यक्रमास शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार विभाग प्रमुख अॅड.अनिल परब,शैलेष फणसे राजुल पटेल, राजेश शेटटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर बालदिनाचा  कार्यक्रम सातबंगला मॉडेल टॉउन अंधेरीे प.येथील चाचा नेहरू उद्यानात होणार आहे.                                                 मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने या बालदिनानिमित बाल गोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभ  होणार असून यावेळी पारंपरिक नुत्यचा गीतांचा  कार्यक्रम , बाळगोपांळासाठी खाऊ वाटप ,फटाक्यांची आतिशबाजी,अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र(बाळा)आंबेरकर यांच्यासह प्रमुख आयोजक संजीव कल्ले .राजेश ढेरे, अशोक मोरे, अनिल राऊत, योगेश गोरे, सचिन नायक, मनोहर नायक, शौकत  विराणी, संतोष साटम, सुरेश बंगेरा , उमा ढेरे, ममता गुप्ता, हे अविरत परिश्रम घेत आहेत.