मुंबई महापालिकेचा प्रिमियमही थकीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12 Dec 2017
630
नागपूर, 12 मुंबई महापालिकेच्या भूखंडावर पुनर्विकास आणि इमारत बांधकाम प्रकल्पासाठी देय असलेली ३९३ कोटी रूपयांची रक्कम थकीत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनीही अन्य एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रकल्पाचा कालावधी संपुष्टात आलेल्या प्रकल्पांमधील विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांचे बांधकाम स्थगित करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भोईवाडा गाव, परळ येथील नागरी नूतनीकरण योजनेंतर्गत विघ्नहर्ता बिल्डर्सची पुनर्विकासाच्या विलंबाबात तसेच महापालिकेला देय असलेला महसूल न दिल्याने नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता, पराग अळवणी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.